+91 9422934434

प्राथमिक शिक्षक संघाची दि.१९ रोजी कोल्हापूर येथे राज्यस्तरीय महामंडळ सभा

By राजकीय कट्टा टीम January 09, 2020

कळंब  दि ०९--महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय महामंडळ सभा रविवार दि.१९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता कोल्हापूर येथे होणार असल्याची माहीती शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यानी दिली आहे .

कोल्हापुर येथील गणेश लाँन्स येथे होणाऱ्या या राज्यस्तरीय महामंडळ सभेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील हे भुषवणार आहेत या महामंडळ सभेस प्रमुख पाहुणे म्हणुन ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ ,शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड ,गृहराज्य मंत्री सतेज[बंटी]पाटील ,नगरविकास राज्य मंत्री ना.प्राजक्त तनपुरे,आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर तर स्वागताध्यक्ष शिक्षक संघाचे नेते मा.संभाजीराव थोरात हे उपस्थित रहाणार आहेत.

   या राज्यस्तरीय महामंडळ सभेत राज्यातील शिक्षण , विद्यार्थी व शिक्षकांचे महत्वाचे प्रश्न मांडण्यात येणार आहेत त्यात प्रामुख्याने १ नोव्हेंबर २०००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागु करावी ,नगरपालीका व महानगर पालीका शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी राज्य शासनाने १००टक्के अनुदान द्यावे , शिक्षकांच्या बदली धोरणात अवश्यक ते बदल करुन सर्वसमावेशक धोरण तयार करावे त्यात विस्थापित व रेंडम राऊंड मध्ये गेलेल्या शिक्षकांना प्रथम संधी द्यावी,वस्तीशाळेतुन शिक्षकांचा दर्जा मिळालेल्या निदेशकांनाची सेवाजेष्टतेसाठी मुळ सेवा ग्राह्य धरुन त्यांना TET मधुन सुट देण्यात यावी ,शिक्षकांना बीएलओ सह इतर अशैक्षणिक कामातुन मुक्त करावे,वैद्यकीय उपचारासाठी शिक्षकांनाही कँशलेस सुविधा देण्यात यावी ,नगरपालीका व महानगर पालीका शाळेतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग त्वरीत लागु करावा,केंद्रप्रमुखाची पदे पुर्वीप्रमाणेच प्राथमिक पदवीधर शिक्षकातुन पदोन्नतीने भरावीत,शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी राज्य रोष्टर करावे,सातव्या वेतन आयोगातील त्रुटीचे निराकरण करुन खंड २ लवकर प्रसिद्ध करावा, जिल्हापरीषद ,नगर पालीका व महानगर पालीकेतील इयत्ता १ ली ते ८ च्या १००टक्के विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात यावा,इतर कर्मचाऱ्यां प्रमाणे शिक्षकांना १०,२० व ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागु करावी,महागाईच्या प्रमाणानुसार शिक्षण सेवकांचे मानधन २५ हजार रुपये करावे ,घरभाड्यासाठी वास्तव्य पुरावा म्हणुन ग्रामसभेच्या ठरावाची सक्ती करु नये ,संगणक प्रशिक्षणास मुदतवाढ देऊन केलेली वसुली परत करावी , गुणवत्तेवर प्रतीकूल परिणाम करणारे सतत प्रशिक्षण कमी करावे या सह अनेक प्रश्नांची उकल या महामंडळ सभेत करण्यात येणार आहे .

  राज्यातील शिक्षकांनी या महामंडळ सभेस हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे ,कार्याध्यक्ष अंबादास वाजे ,सरचिटणीस आप्पासाहेब कुल संपर्क प्रमुख मोहनमामा भोसले ,एन.वाय.पाटील,विनोद राऊत कोषाध्यक्ष जनार्धन निऊंगरे महीला आघाडी प्रमुख श्रीम अनुराधा तकटे यांनी केले आहे.

Share This