+91 9422934434

पत्रकारितेतून माणस जोडणारे-सतिश(बप्पा)टोणगे

By राजकीय कट्टा टीम January 10, 2020

उस्मानाबाद दि.१०(वाढदिवस व्यक्तीविशेष)- कळंब तालुक्यातील पिंपळगाव अगदी छोटेसे असणारे गाव पण जिल्ह्यात आज सतीश टोणगे यांच्या मुळे नावारूपाला आलेले आहे येथील टोणगे घराणे आज कळंब येथील प्रतिष्ठित झाले आहे. या मागे त्यांच्या कुटुंबाचा फार मोठा संघर्ष आहे एकत्र कुटुंब तीन भावाचे प्रेम कसे असावे हे यांच्या कडे पहिल्या नंतर कळते जीवनातील तीस वर्षाचा यशस्वी रित्या प्रवास करत मोठ्या संघर्षातून पुन्हा नवा जन्म घेऊन आपल्या कार्याचा दबदबा कायम टिकवून ठेवणारे आदर्श पत्रकार सतीश टोणगे अनेकांचे मार्गदर्शक म्हणून त्यांना सन्मान देण्यात येतो-त्यांच्या कार्याचा धावता घेतलेला हा मागोवा कारण त्यांचे काम शब्दात बसणारे नाही पण नक्कीच प्रेरणदायी ठरणारे आहे.

महाविद्यालयीन जीवनापासून पत्रकारिता करत एक राजकीय नेतृत्व स्वीकारून ते आपल्या कार्याने जन माणसापर्यंत नावाजलेले व्यक्तीमत्व आहेत , विज्ञान शाखेचा विद्यार्थी असतानाही,महाविद्यालयीन प्रतिनिधी म्हणुन बप्पानी विविध दैनिकात काम केले. वाचकांचे पत्रव्यवहारमध्ये ते लिहु लागले . काही दिवसनंतर दैनिक राजधर्म चे काम चालु केले. खडतर अशा पत्रकारीता प्रवासामध्ये यशस्वी झाले.कॉलेज मध्ये पत्रकारिता करतानाच ते वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून आले व ते ग्रामीण मित्रांचा आधार बनले यावेळी संतोष देशपांडे, रणजित खंदारे, प्रभाकर सावळे, अशोक शिंदे, गोर्वधन डिकले  हे दैनिकात काम करत होते.जेष्ठ पत्रकार स्व.शिवशंकर घोंगडेबप्पांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. बातम्या चुकल्यातर भिडभाड ठेवत नसत.शिवशंकर बप्पा शिस्तप्रिय आणि शब्दावर पकड मजबुत असलेले पत्रकार होते त्यांनी बातमी कशी लिहावी याचे सखोल मार्गदर्शन दिले, शिवशंकर बप्पानी एक निर्भीड पत्रकार घडविला कळंब पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केली. शहरात पत्रकारांची संख्या वाढल्यानंतर ते कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष झाले. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनिय काम करणा-या पत्रकार यांना पत्रकारिता पुरस्कार सुरू केले. वर्षभर विविध कार्यक्रम घेतले त्यामुळे समाजाशी एक नाळ जोडली गेली. आणि चांगला संपर्क झाल्यामुळे सतीश बप्पा यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली . पत्रकारिता करत ते राजकारणात हि यशस्वीरित्या काम केले आणि कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक व नगर परिषद मध्ये दोन वेळा नगरसेवक म्हणुन काम करण्याची संधी मिळाली. 

   दैनिक केसरी मध्ये काम करत होते पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश झाला. त्यानंतर दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दैनिक एकमत मध्ये काम चालु केले आणि पत्रकारीतेच्या क्षेत्रात तीस वर्ष काम करत असताना दैनिक एकमत मध्ये सलग 28 वर्ष पत्रकार म्हणुन काम चालु आहे.पत्रकारिता करत असताना ते उत्तम व्यासायिक म्हणून नावारूपाला आले होते.एक व्यासायिक म्हणूनविदेशी दौरे हि केले आहेत,ऑस्ट्रलिया ,न्यूझीलंड ,शिंगापुर,नेपाळ, ब्येन्कॉक,पटाया,इ परदेश दौरे केले आहेत. दैनिक एकमत मध्ये बातमी लिहीत विविध स्तंभलेख त्यांनी लिहिले आहेत-१]कुजबुज २] मांजर काठ ३] अंतरंग ४] आले गणराय ५]गावाकडची मानस ६]पहिला दिवस शाळेचा ७]अडगळ ८] आटोळा ९] गावाकडचा गणपती १०]मी खेळाडू असताना ११]जागर आईचा १२]श्रद्धास्थान १३] इठ्ठल- इठ्ठल १४] पारावरचा गणपती १५] चला वारीला १६] आई राधा उदो उदो १७]माझा गणपती १८] राम राम मेंबर १९]उस्मानाबाद आयडॉल २०]वारी आली दारी २१]प्रेमायन इ पंचेविस विविध विषयावर लिखाण केले आहे व आज ही चालू आहे 'प्रेम हे असेच असते'हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे .

पत्रकारिता करत असताना त्यांचा गुणगौरव हि करण्यात आला आहे- १]रा .इ.काकडे पुरस्कार,२]नेहरू युवा केंद्राचा युवा पुरस्कार ३] दै.एकमत गुणगौरव पुरस्कार ४] गुरु रामचंद्र बोधले महाराज विशेष पुरस्कार ५]सेवा समिती कळंबचा दर्पण पुरस्कार असे एकूण तीस पस्तीस पुरस्कार मिळाले आहेत . बप्पानी अनेक संकटाचा सामना केला परंतु कधीच थकले नाहीत. त्यांच्याकडे पाहिले की आम्हाला ऊर्जा मिळत असते परंतु तीन वर्षा पूर्वी अचानक त्या ना आजाराने ग्रासले होते.अचानक स्वास घेण्यास त्रास होऊ लागला.कळंब येथील खाजगी दवाखान्यात त्यांना ऍडमिट करण्यात आले.प्राथमिक उपचार झाले पण काही उपयोग झाला नाही.कळंब ते बार्शी तीन चार वेळा उपचार करण्यासाठी त्यांना नेण्यात आले पण काही विलाज होत नव्हता सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटल मधील डॉक्टरने पुणे येथील रुबी हॉस्पिटल मध्ये बप्पाला दाखल करण्याचा सल्ला दिला अतिदक्षता विभागात दखल करण्यात आले. उपचार चालू होते,कळंब मध्ये इतर पत्रकार बांधवानी बप्पाच्या तब्येतीसाठी देवाला साकडे घालत होते.अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते,ज्यांना जे वाटेल त्या मार्गाने देवाला साकडे घालत होते.रुबी हॉस्पिटल मध्ये आय सी यु मध्ये असलेले बप्पा अखेरची घटका मोजत असतानाही पत्रकारिता जपत होते,हातात सिरीज असताना पेन घेऊन कागदावर लिहीत होते.मांजर काठ या सदरचा भाग एकमत साठी लिहून पाठविला.रुबी हॉलच्या एनटीयु मधून या नावाने लेख प्रसिद्द झाला.समोर मरण दिसले कि माणूस काही बाही बडबडायाला लागतो.पण याला अपवाद बप्पा असावे कि अतिदक्षतामध्ये बेडवर मरणाला घाबरता आपली लेखणी चालवत होते.

  तीस वर्षाचा पत्रकारितेला प्रवास तोही मरणाच्या दारी चालूच होता.समाजासाठी खऱ्या माणसाची गरज असते तेव्हा यम हि आपला फास काढून घेतो. रूबी हॉल मध्ये एकुण बावीस दिवसाचा मुक्काम करून मरणाला झुगारून ठणठणीत होऊन पुन्हा बप्पा कर्मभूमीकडॆ सुखरुप आले.अनेक नातेवाईक,मित्र परिवार,नेते मंडळी भेटून गेले.नवा जन्मच झाला होता.मिळालेला जीवनाचा बोनस राहिलेले आयुष्य समाजासाठी घालविणे अशी प्रतिज्ञा करून बप्पा आज ही तेवढ्याच जोमाने पत्रकारिता करत आहेत,नगर परिषद मध्ये दुसऱ्या वेळेस नगरसेवक म्हणुन काम करत आहेत.संकटावर कशी मत करायची हे या माणसा कडे पहिले कि कळते.

वर्ग प्रतिनिधी ते पत्रकार व बाजार समिती संचालक म्हणून राजकारणात प्रवेश, दोनदा नगरसेवक म्हणून निवड,लेखक ते तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे.जवळ जवळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बावीस वर्ष म्हणून पदभार स्वीकारून यशस्वीरित्या कार्य पार पडले आहे. मराठी पत्रकार परिषदेचा कै.वसंतराव काणे उत्कृष्ट पुरस्कार तालुका पत्रकार संघाला मिळून दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपत अन्नदाता पुरस्कार ,धडपड्या युवक पुरस्कार,पत्रकारांना पुरस्कार, पत्रकारांना विम्याचे कवच ,संघटन बांधणी असे विविध कार्य केले आहे. ते राजकारणात ही यशस्वी आले वर्ग प्रतिनिधी ते दोनदा नगरसेवक म्हणून त्यानी काम केले शिवाजी अप्पा कापसे यांनी त्यांना राजकारणात ही काम करण्याची संधी दिली आणि त्या खुर्चीला न्याय मिळाला पत्रकार संघाला पत्रकार भवणासाठी जागा ही मिळवून दिली ग्रामीण पत्रकारांना त्यांचा खूप मोठा आधार असून विम्याचे कवच ही संकल्पना त्यांनी पुढे आणली त्यांना पस्तीसच्या वर पुरस्कार मिळाले व पत्रकार संघा ला मनाचा पुरस्कार मिळवून दिला अष्टपैलू आजातशत्रू म्हणून त्यांची इतिहासात नोंद होईल साहित्यिक म्हणून त्यांची प्रेम हे असच असत , कळंब ते रुबी हॉल,ऊर्जा स्तंभ,मांजर काठ हे पुस्तके प्रकाशित आहेत. १० जानेवारी १९७२ ला त्यांचा जन्म झाला आणि सर्व सामान्य माणसांना आधार मिळाला.पत्रकारिता जोपासत त्यानी हजारो मित्र कमावले गरीब श्रीमंत असा भेद भाव कधी च केला नाही म्हणून आज ही सर्वांना प्रिय आहेत व वेळ ही देतात एका तरुण युवकासारखे सतत कार्यरत असतात.सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली असून ते गरजू लोकांना सतत मदत करत असतात. गरिबीची जाणीव असल्यामुळे ते गरीब मुलांना आथिर्क,मदत करत असतात.समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेने ते सतत समाजातील होतकरू ,हुशार, गरजू ,व्यक्तीच्या व्यथा आपल्या लेखणीतून मांडून व्यक्तीनां न्याय देण्याचा ते प्रेयन्त करत असतात,एक झुंजार पत्रकार,निर्भीड पत्रकार,शोध पत्रकारिता करणारे अभ्यासु पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे.

त्यांनी बालमित्रांना सोबत घेवून दोस्ती ग्रुप तयार केला तीस वर्षा पूर्वीचे मित्र एकत्र आले आणि त्यातून समाज सेवा ही घडू लागली या ग्रुपला दोन पुरस्कार ही मिळाले व ग्रुप मधील मित्रांना जन्म दिनाच्या निमित्ताने विम्याचे कवच दिले त्यांच्या कामाची तडप पाहून आम्हाला ही हेवा वाटतो किती ही थकवा आला तरी तो थकवा बाप्पा नी कधी ही दाखव ला नाही सतत हसत आमच्या शी गप्पा मारून आम्हाला आधार देतात पत्रकारिता शेत्रात तरुणांनी. यावे या साठी ते नेहमीच प्रयत्न शिल असतात व त्यानी ही या मध्ये करीयर करून कुठले ही शेत्र हलके नसते हे दाखवून दिले आहे अश्या सर्व गुन संपन्न विविध अष्टपैलू व्यक्तीमत्वास जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन पुढील आयुष्य उत्तम भरभराटीचे आनंदीमय,निरोगी जावो हि ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

योगराज पांचाळ दहिफळकर 9403395140

Share This