+91 9422934434

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आ.डॉ.तानाजी सावंत यांच्यात बेबनाव?

By राजकीय कट्टा टीम January 01, 2020

मुंबई दि.१-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारादिवशी म्हणजेच 30 डिसेंबर रोजी खटके उडण्याची माहिती ती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

  त्यात त्यांनी असे म्हटले आहे की,आ.तानाजी सावंत हे मला मंत्रिपद का नाही असे विचारण्यासाठी मातोश्रीवर गेले होते मात्र त्याच दिवशी मंत्रिमंडळ विस्तार असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आ. तानाजी सावंत यांना भेट नाकारली त्यानंतर मुख्यमंत्री थेट विधानभवनाकडे निघाले असता आ.तानाजी सावंत हे हे त्यांच्या गाडीकडे गेले व त्यांनी त्या ठिकाणी मी आता मंत्रीपद मागण्यासाठी मातोश्रीवर येणार नाही असे उद्धव ठाकरे यांना सुनावले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आ.सावंतांना जय महाराष्ट्र करत तेथून विधान भवन गाठले.

    आ.तानाजी सावंत हे भाजपा-शिवसेना महायुतीच्या सरकारमध्ये शेवटचे तीन महिने जलसंधारण मंत्री म्हणून काम पाहत होते त्याच बरोबर ते शिवसेनेचे उपनेते व सोलापूर,उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून देखील काम पाहत आहेत.त्याचबरोबर शिवसेनेचे सरकार येणार हे निश्चित झाल्यावर आ. तानाजी सावंत यांचे नाव मंत्रिमंडळाच्या यादीत होते मात्र ऐनवेळी त्यांच्या नावाला कात्री लागल्याने नेमक आपलं मंत्रिपद का कापलं हे विचारण्यासाठी ते मातोश्री वरती गेले असल्याची विश्वसनीय माहिती ती आहे.

  आता या घडामोडीनंतर आ.तानाजी सावंत हे नेमकी काय भूमिका घेतात याकडं महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिला आहे.आ.तानाजी सावंत हे शिक्षण क्षेत्रातील व साखर कारखानदारीतील एक मोठं प्रस्थ आहे त्याचबरोबर शिवसेनेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाची व पक्षाच्या अनेक मेळाव्याची जबाबदारी देखील यापूर्वी आमदार सावंत यांनी निभावली आहे.

Share This