+91 9422934434

बलशाली राष्ट्र निर्मितीचे नवदधिची पंतप्रधान नरेंद्र मोदी

By पांडूरंगआण्णा पवार December 29, 2019

उस्मानाबाद(पांडूरंग पवार)-प्रगत सुरक्षित निकोप समाज निर्मिती, बलशाली राष्ट्र निर्माण ही काही बाजारातील विषय वस्तु नाही की घासाघीस केली आणि पिशवीत भरून विकत आणली,किंवा ती काही मार्केट मध्ये एकावर एक फ्री मिळणारी स्कीमही नाही, सुरक्षित प्रगत समाज निर्मितीसाठी नेतृत्वाने स्वतःच्या सर्वसुखाचा त्यागच करावा लागतो, किंबहुना समाजाच्या निर्मितीसाठी स्वतःच्या शरीरातील हाडे दान द्यावी लागतात हा परिपाठ महर्षीं दधिची यांनी घालुन दिला होता...पण आम्ही इतके दुबळे निघालो की पुराणात इतिहासात घडलेल्या प्रसंगांना भाकड कथा म्हणुन हेटाळणी करत पुढे आलो.

बोलायला काय जातंय की अमुक देश पुढे गेले तमुक देशाने आपल्या पेक्षा अधिक प्रगती केली...ते कदाचित सत्य असेल किंवा ती केली आहेच पण तशी काही पाऊले आपल्या देशातील नेत्यांनी उचलली की त्याची फारशी चर्चा प्रसिद्धी माध्यमातून होत नाही,किंवा सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन काही निर्णय घेतला तर त्याबद्दलची जागरूकता त्याला पाठबळ देणारी वृत्तमालिका,चर्चा कधी दिसत नाही... आता असाच एक निर्णय सध्या राबविला जातोय तो म्हणजे वाहनांना fastag बसवने,हा निर्णय घेतल्याने देशातील आर्थिक शिस्त सुधारण्यासाठी मदत होणार आहे,पण प्रसिद्धीमाध्यम (TV) देशात CAA/NRC ची चर्चा घडवण्यात आणि जाहिरातीतुन मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नात गुंतली आहेत. तर मागच्या 10 दिवसापासून वाहनांच्या समोरच्या काचेवर fastag हे स्टिकर बसवण्याची मोहीम खऱ्या अर्थाने पूर्णत्वाकडे निघाली आहे,fastag म्हणजे आज वाहनांकडून जो toll टॅक्स घेतला जातो तो आता वाहनमालकांच्या खात्यावरून ऑनलाइन थेट toll घेणाऱ्या संस्थेच्या खात्यात जमा होईल,परिणामी वेळ तर वाचेलच पण महत्वाचे म्हणजे toll tax गोळा करणारी ठेकेदार संस्था कामावर किती पैसा खर्च करते आणि बदल्यात किती पैसा गोळा करते हे समजुन येईल,पुढे त्याला खर्च व नफा प्रमाण तपासुन त्या संस्थेचा काँट्रॅक्ट पिरियड वाढवने किंवा कमी करणे ही प्रक्रिया सहज शक्य होणार आहे.

देशात inernet,online money transaction या बाबी सुरू होऊन साधारणपणे 30 वर्ष झाली आहेत,इंटरनेट ही जगासाठी वरदान ठरले असून जागतिक महासत्ता म्हणवणाऱ्या सर्व देशानी त्यांच्या सर्व प्रकारच्या व्यवस्था इंटरनेटवर आधारित केल्या आहेत,त्यावर अधिकाधिक लक्ष पुरवून त्यात होणारे बदल स्वीकारले आहेत,विशेषतः शासकीय व्यवहार आर्थिक देवाणघेवाण ही संपूर्णपणे इंटरनेटच्या कक्षेत आणुन प्रगत देशानी स्वतःच्या अर्थव्यवस्थेला लागलेले उंदीर संपुष्टात आनले आहेत,परिणामी प्रगत देशाची अर्थव्यवस्था बळकट अजुन बळकट होत गेली. आपल्या देशाचे दुर्दैव म्हणजे भारतीय राजकारणात असलेले लोक त्यांच्या अनुयायांना राजकारणातुन अर्थप्राप्ती झाली पाहिजे यासाठी कमालीचे आग्रही राहिले आहेत,आणि इंटरनेट आधारित आर्थिक व्यवहार व्यवस्थापन केल्यास या बाबी शक्य होत नाहीत,मग स्व.राजीव गांधींच्या काळात देशात इंटरनेट आले या एका वाक्यात समाधान किंवा ऐट मिरवावी लागते,सर्वंकश क्षेत्रांत इंटरनेट आधारित आर्थीक व्यवहार लागु केलेच नाहीत आणि जगात अनेक देशानी आपल्या अर्थव्यवस्था इंटरनेट वापरुन मजबुत केल्या,शासकीय किंवा शासनाच्या उपक्रमात सहाय्यभुत ठरणारे कोणतेही घटक आर्थिक नुकसान करणार नाहीत अशी रचना लावणे हे निर्णयप्रक्रियेत असलेल्या नेत्यांचे काम आहे पण या विषयात गती आली ती विद्यमान पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या कार्यकाळात नरेंद्र मोदींनी आपल्या प्रत्येक निर्णयाला आर्थिक शिस्त राहील यासाठी प्रयत्न केले आहेत,अनेक घटकांचा विरोध घेऊन विशेषतः भारतीय मिडिया हा बहुतांशी आर्थिक लाभावर आधारित कामकाज चालवितो,तसेच जनतेला आर्थिक भार उचलावा लागतो पण त्यांना खरेदीची साधी पावती घेण्याची फुरसत नसते,कधी एकदा व्यवहार करेन आणि रिकामा होईन ही जनतेची मनोवस्था आणि याच मनोवस्थेचा पुरेपुर फायदा उचलत आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ इच्छिणारे वेगवेगळे वर्ग उदयास येणे ही आमची सामाजिक शासकीय उपलब्धी राहिली आहे.

परिणामी देशाच्या प्रचंड आर्थिक व्यवहारातील शासनाला जायचा tax रुपी हिस्सा शासनाचे अधिकारी, गुत्तेदारी, किंवा यांचावर असलेले राजकीय अधिकार प्राप्त नेते यांनी घेतला आहे. याचा पुढील परिणाम म्हणून देशाला स्वतःची व्यवस्था,विकास प्रक्रिया चालवण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागले आहे. मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी जनतेनी दिलेला जनादेश स्वतःची वाहवाह किंवा बदनामी याची भीती न बाळगता देशाच्या आर्थिक हितासाठी वापरला आहे. नोटबंदी, GST किंवा अन्य आर्थिक व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत, Fastag ही अशीच एक आर्थिकशिस्त आहे,मागच्या काही वर्षांत toll tax म्हणजे जनतेची लुट असा समज रूढ झाला आहे जो की 100% सत्याच्या जवळ जाणारा आहे,जनतेच्या मनात आपल्या देशाच्या एकाद्या व्यवस्थेविषयी असा समज निर्माण होणे हे त्या त्या काळातील राज्यकर्त्यांचा पराभव म्हणायला हरकत नाही, पण कायद्याची सक्ती किंवा कारवाईची भीती म्हणून जनता अशी शासकीय देणी देत असते आणि संबंधीत निर्णयप्रक्रियेतील वर्ग स्वतःच्या झोळ्या भरत असतो. Fastag ही toll tax प्रणाली लागु होताच याच्या लागु होण्याने काही मंडळींना याचे त्यांच्या दैनंदिन व्यवहारात आर्थिक दुष्परिणाम समजून आले अशानी काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला, काही घटकांच्या मते मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी जनतेला त्रस्त केलं आहे, रोज वेगवेगळे निर्णय घेऊन जनतेला वेठीला धरले जात असल्याचा बागुलबुवा उभा केला जातोय आणि थोडा त्रास होताच मनस्ताप वाटणारे समाजमन या थापाना बळी पडत आहे. आपला देश गेली अनेक शतके परकीय आक्रमकांनी लुटला व मागच्या काही दशकांत स्वकीय राजकारणी लोक अत्यंत धुर्तपणे तोच परिपाठ चालवत आहेत,एकीकडे विकास, सुरक्षा,कर्जाची परतफेड, प्रशासन या सक्तीच्या खर्चाचा दबाव आणि दुसरीकडे राजकीय प्रयत्नांचा अभाव यामुळे आपण जागतिक आर्थिक महासत्तांच्या तुलनेत अगदीच दुर्लक्षित ठरलेले आहोत,यावर उपाय म्हणजे राज्यकर्त्यांनी कठोर निर्णय घेणे आणि स्वतःला त्रास झाला तरी जनतेनी ते निर्णय पाळणे आवश्यक असनार आहे,मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रयत्न,निर्णय व जनतेने त्या निर्णयांचे केलेले स्वागत पाहता आपण योग्य मार्गाने जातोय. दुर्दैवाने काही राजकीय पक्ष,नेते,काही प्रसिध्दीमाध्यमे,सामाजिक संस्था तथा आर्थिक गैरप्रकारांत गुंतलेल्या घटकांचे मनःपरिवर्तन हे मोठे आव्हान असणार आहे.याआजच्या काळातील असे घटक म्हणजेच पुराणातील वृत्तासुर असुन त्याचा निप्पात करण्यासाठी स्वतःच्या शरीरातील हाडे दान देऊन कठीण वज्रनिर्मितीचे कार्य पुर्ण करणारे महर्षी दधिची म्हणजे आजचे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी होय.

लेखक-पांडुरंग(अण्णा)पवार मो-९४२१८८६५४३

Share This