+91 9422934434

कळंबमध्ये स्व.गणपतराव कथले युवक आघाडीच्या वतीने माणूसकीची भिंत

By राजकीय कट्टा टीम January 11, 2020

कळंब दि.१०-कळंबमध्ये कथले युवक आघाडीच्या तरूणांनी बस स्थानक येथे उभारली माणुसकीची भिंत स्व.गणपतरावजी कथले युवक आघाडी च्या वतीने बस स्थानक येथे माणुसकीच्या भिंत उभा करण्यात आली. गेल्या वर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास २०,००० लोकांना याचा लाभ मिळाला होता. अनेकजण घरातील अबालवृद्ध कपडे आणून ठेवत आहेत व ज्यांना खरोखरच कपड्यांची गरज आहे ते घेऊन जात आहे.

    शहरातील अनेक लोकांनी कपडे आणून देईला सुरुवात केली आहे हा उपक्रम ६ वर्षांपासून शहरात राबविण्यात येत या भिंतीचे उदघाटन पत्रकार संघाचे विश्वस्त तथा नगरसेवक सतीश टोणगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा शहराध्यक्ष संदीप बावीकर,शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाचिटणीस बाळासाहेब धस,पत्रकार संघाचे अध्यक्ष शितलकुमार घोंगडे,दिलीप गंभीरे,अशोक शिंदे,अमर चोंदे, रोटरी क्लब चे अध्यक्ष हर्षद आंबूरे,परवेज मुल्ला यावेळी कथले युवक आघाडी चे बाळासाहेब कथले,सुमित बलदोटा,भाऊसाहेब शिंदे,यश सुराणा,संकेत भोरे,ऋषीकेश साखरे,मनोज फल्ले,धर्मराज पुरी व कथले आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते.

Share This