+91 9422934434

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागीय समन्वयकपदी डॉ.प्रकाश पांढरमिसे यांची नियुक्ती

By राजकीय कट्टा टीम December 20, 2019

इंदापूर जि.पूणे दि.२०-बावडा येथील श्री शिवाजी एज्यूकेशन सोसायटीचे श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रकाश बुवाजी पांढरमिसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने इंदापूर तालुका विभागीय समन्व्यक (Area Co-Ordineter)पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. डॉ. पांढरमिसे हे सन 2016पासून महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहतात.

केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबवित असलेल्या सर्वच उपक्रमांचे आयोजन उत्तम प्रकारे करणारे महाविद्यालय म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन विद्यापीठाने त्यांची इंदापूर तालुका विभागीय समन्वयक पदी नुकतीच निवड केली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदचे सदस्य, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, पुणे जिल्हा ग्रामीण समन्वयक डॉ. विलास कर्डीले, इंदापूर तालुक्यातील सर्वच महाविद्यालयातील रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी यांनी डॉ. पांढरमिसे यांचे अभिनंदन केले.तसेच,संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री मा. हर्षवर्धनजी पाटील साहेब, पुणे जिल्हा परिषेदेच्या सदस्या अंकिता ताई पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, संस्थेचे सचिव आणि बावडा गावचे सरपंच किरण पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लहू वावरे व महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी डॉ. प्रकाश पांढरमिसे यांची राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्व्यक पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Share This