+91 9422934434

सृजनात्मक लेखन कौशल्य ही काळाची गरज-डॉ.प्रतापसिंह पाटील

By राजकीय कट्टा टीम January 14, 2020

कळंब: दि.१४- आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात मात्र ज्या पद्धतीने मराठी ही आपली मातृभाषा आहे. त्याच पद्धतीने हिंदी ही राष्ट्रभाषा आहे.मराठी ही भाषा मधुर आहेच पण हिंदी भाषेत जो गोडवा आहे तो गोडवा इतर भाषेमध्ये दिसून येत नाही असे प्रतिपादन धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील सृजनात्मक लेखन अंतर्गत 'क्रिएटिव्ह रायटिंग फॉर क्रिएटिव्ह लिव्हिंग' या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.यावेळी व्यासपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल, सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, संचालक प्रा.संजय मिटकरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल पवार ,आय.क्यू.ए.सी.समन्वयक डॉ.कमलाकर जाधव,कार्यशाळा समन्वयक डॉ.दत्ता साकोळे, उपप्राचार्य प्रा.गोकुळ घोलप व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की ' वाचाल तर वाचाल, वाचनाशिवाय यश प्राप्त होऊ शकत नाही, जास्तीत जास्त पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजेत त्यामुळे बौद्धिक विकास होण्यासाठी मदत होते. अंबाजोगाई येथील एस.आर.टी.कॉलेजचे हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉ.राम बडे यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की,' प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून व प्राप्त परिस्थितीवर मात करण्याची क्षमता प्राप्त करून जीवनामध्ये यशस्वी झाले पाहिजे.' तसेच ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर सर बोलताना म्हणाले की, 'प्रतिकूल परिस्थिती ही मानवाला घडवत असते कारण झारखंड सारख्या प्रतिकूल परिस्थिती असलेल्या राज्यांमध्ये हे सगळ्यात जास्त एम.पी.एस.सी- यु. पी. एस. सी. मध्ये पास होऊन मोठ्या प्रमाणावर नोकरीवर असलेले विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात.

याप्रसंगी गेल्या दहा वर्षांमध्ये हिंदी विषयांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पीएचडी, नेट ,जी आर एफ,टायपिस्ट, ऑफिसर,हिंदी प्राध्यापक,शिक्षक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.सत्कार मूर्तीमध्ये श्री.मारुती शिंपले व श्री. रंजीत वर्पे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच महाविद्यालयांमधून पहिल्यांदा प्रोफेसर झालेले डॉ.ज्ञानेश चिंते,डॉ.एल.एम.थोरात.डॉ.एच.के.भगवान यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ.एस.आर.कांबळे, डॉ.एस.एन. वांगीकर, प्रा.जे.जी.लोहकरे ,डॉ.एन.जी.साठे,प्रा. अर्चना मुखेडकर,प्रा.मीनाक्षी जाधव व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.के.डी.जाधव,प्रास्ताविक डॉ. दत्ता साकोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.काझी जाकीर यांनी मांडले.

इंटरनेटच्या जगातही लेखन कौशल्य महत्वाचे - एफ. एम. सलीम
हिंदी भाषेमध्ये विशेषता पत्रकारिता आणि अनुवाद या क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत, सृजनात्मक लेखन कौशल्य,आज काळाची गरज झाली आहे. इंटरनेटच्या ,मोबाईलचा युगात सुद्धा लेखन कौशल्य याला महत्व प्राप्त झाले आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर सृजनात्मक लेखनाकडे वळणे आवश्यक आहे असे वक्तव्य एफ. एम. सलीम, हैदराबाद येथील हिंदी दैनिक समाचार पत्र चे पत्रकार याने मोहेकर महाविद्यालय येथे सृजनात्मक लेखन कौशल्य या विषयावर झालेल्या एकदिवशीय कार्यशाळेमध्ये केले .

Share This