+91 9422934434

शिक्षण क्षेत्रातील ऋषीतूल्य व्यक्तीमत्व-डॉ.वेदप्रकाश पाटील

By राजकीय कट्टा टीम January 02, 2020

उस्मानाबाद दि०२(वाढदिवस व्यक्तीविशेष)- काही माणसं मेहनतीच्या बळावर यशाची शिखर गाठतात आणि शिखरावर जाऊन सुद्धा आपल्या सोबतच्या माणसाला विसरत नाहीत अशाच व्यक्तिमत्व पैकी एक असणारे धनेश्वरी बोरगावचे सुपुत्र तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.वेदप्रकाश पाटील.आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप.

      डॉ.वेदप्रकाश पाटील हे धनेश्वरी बोरगाव अॕड.काशीराव पाटील यांच्या पोटी जन्मलेलं एक रत्न. डॉ.वेदप्रकाश पाटील यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर वर्ग-3 पासून आपल्या सेवेस प्रारंभ केला. महाराष्ट्रातील कोकण,मराठवाडा या भागात शासकीय सेवेत सेवा केल्यानंतर त्यांना वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठ मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर इंदिरा गांधी कृषि विश्वविद्यालय रायपुर या ठिकाणी देखील त्यांनी कुलगुरू म्हणून काम पाहिले.अखिल भारतीय कुलगुरू परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास मिळालेले ग्रामीण भागातील ते कदाचित पहिलेच कुलगुरू असतील.

  परंतू त्यांनी सामान्य माणूस व आपल्या मातृभूमीची असणारी नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही.शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर धनेश्र्वरी शिक्षण समूहाच्या माध्यमातून त्यांनी ज्ञानदानाचे कार्य करण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्यातच त्यांच्या आवडीचं असणारे क्षेत्र म्हणजे कृषी.त्यांनी अनेक कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण देऊन ग्रामसेवक,तलाठी,कृषी सहाय्यक,कृषी अधिकारी यासह राज्य सेवा व भारतीय प्रशासन सेवा  यामध्ये अनेक पदावर काम करण्यासाठी तयार केले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले आज त्यांनी वयाची 78 वर्षे पूर्ण केलेली असली तरी त्यांच्या कामाचा पाठपुरावा करण्याची पध्दत वाखाणण्याजोगी आहे. एखादे काम हातात घेतले की ते काम पूर्ण होईपर्यंत ते कधीही उसंत घेत नाही त्याच बरोबर एखादा कर्मचारी चुकला तर त्याला समजावून सांगून ते काम कशा पद्धतीने करून घ्यायचे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.

     राजकीय क्षेत्रात ज्या पद्धतीने शरद पवार यांचं नाव घेतलं जातं त्याच पद्धतीने शिक्षण क्षेत्रात डॉ.वेदप्रकाश पाटील यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल कारण त्यांचे 78 वय असूनही आजही ते दैनंदिन दोनशे ते अडीचशे किलोमीटर प्रवास करतात. तसेच एखादे काम जर हातात घेतले तर ते काम दर्जेदार कसे होईल याकडे त्यांचा कटाक्ष असतो.नवनवीन गोष्टींची माहिती करून घेणे हे देखील त्यांचे एक वैशिष्ट्य.

    आज त्यांच्या डॉ.प्रतापसिंह डॉ.उदयसिंह व आमदार डॉ.राहुल तीनही मुलांना त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसचे शिक्षण दिले तर त्यांच्या दोन सुना देखील एमबीबीएस तर एक पीएचडी धारक आहेत. आज ते कुटुंब प्रमुख या नात्याने यशस्वी तर आहेतच मात्र डॉ.वेदप्रकाश पाटील हे नाव राज्यात मोठ्या आदराने घेतले जाते. अशा या उस्मानाबाद जिल्ह्याच्या भूमिपुत्रास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....

शेवटी त्यांच्याबद्दल एकच म्हणावसं वाटतं

आप जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार l

प्रा.सतीश बबनराव मातने
प्राचार्य भैरवनाथ अध्यापक विद्यालय कळंब जि. उस्मानाबाद
मो. नंबर 9881914434

Share This