+91 9422934434

आयान (बाणगंगा)कारखान्याकडून ऊस बिल पहिला हप्ता २३०० रुपयाने शेतकऱ्यांना अदा

By राजकीय कट्टा टीम December 22, 2019

 

भूम दि.२२-आयान मल्टीट्रेड एल.एल.पी. संचलित बाणगंगा स.सा.कारखाना ईडा जवळा ता.भुम जि.उस्मानाबाद या कारखान्याकडून चालू गळीत हंगाम 2019-2020 साठी ऊस बिल पहिला हप्ता 2300 रू. शेतक-र्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची तसेच तोडणी व वाहतूक कंत्राटदारांची कमिशनसह बिले त्यांच्या बँक खात्यावर जमा केली असल्याची माहिती भुम- परांडा-वाशी चे माजी आमदार राहुल मोटे तसेच आयन मल्टीट्रेड एल.एल. पी.चे संचालक सचिन सिनगारे यांनी कारखाना कार्यस्थळावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

        बाणगंगा स.सा.कारखाना हा आयान मल्टीट्रेड एल. एल. पी. या कंपनीने गाळप हंगाम 2018-2019 पासून भाडेतत्वावर गाळपास घेतलेला असून पहिल्या वर्षी कारखान्यामध्ये आधुनिकीकरण करून कमीत कमी पाण्याचा वापर,कमी स्टीमचा वापर,स्वयंचलित यंत्रांचा वापर करून आर्थिक बचत करून पहिल्याच वर्षी कारखान्याने 77147 मे.टन ऊस गाळप करून 88290 क्विंटल साखर उत्पादन मिळवून जिल्ह्यामध्ये रिकव्हरी 11.44 दुस-या क्रमांकाची मिळवली आहे. तसेच गतवर्षीची ऊस बिले,तोडणी बिले,वाहतुक बिले व कमिशन सर्व बिले कारखान्याने अदा केलेली आहेत. तसेच चालू गळीत हंगामामध्ये कारखाना ऊस उत्पादक शेतकरी यांना जास्तीत जास्त ऊसदर देणार असून बिगरॲडव्हान्स वाहन ठेकेदार यांना तोडणी बिलांवर 20% व वाहतूक बिलांवर 40% कमिशन देणार असून दर दहा दिवसांची ऊस बिले व तोडणी वाहतुक बिले कमिशनसह जमा करण्यात येत आहेत त्यामुळे शेतकरी, तोडणी व वाहतुक ठेकेदार यांना ऊस देवून व ऊस तोडणी वाहतूक करून सहकार्य करावे असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.

     यावेळी बाणगंगा कारखान्याचे व्हाईस चेअरमन महादेव खैरे व संचालक तात्यासाहेब गोरे व बाणगंगा कारखान्याचे सर्व संचालक तसेच आयान कारखान्याचे फॅक्टरी मॅनेजर संतोष तोंडले,मुख्य शेती अधिकारी विठ्ठलराव मोरे ,चिफ् इंजि.श्री राजेशकुमार शिंदे,सर्व विभागाचे खातेप्रमुख,कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

Share This